महिला विधिज्ञांचा सन्मान; प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन कापडी पिशव्यांचे वाण
देशासाठी बलिदान देणाऱ्या व आपल्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी कौतुकास्पद उपक्रम -न्यायाधीश योगेश पैठणकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपल्या भारत देशासाठी सीमेवर खडतर जीवन प्रवास करून आपल्याला संरक्षण देणारे तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबातील व्यक्तींना सामाजिक प्रवाहात आणून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी केले.
अहिल्यानगर बार असोसिएशन, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून सावित्री ज्योती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी न्यायाधीश पैठणकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सर्व समाजात आदराचे स्थान असले पाहिजे. त्यांच्या संघर्षमय जीवनासाठी आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. हळदी-कुंकू सारखे उपक्रमातून सामाजिक जाणीव, सलोखा, समता दिसून येते. जय युवा अकॅडमी करीत असलेले समाजकार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अहिल्यानगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, उपाध्यक्ष ॲड. घुले, सचिव शेटे, खजिनदार ॲड. वसीम खान, महिला सहसचिव ॲड. सारिका झरेकर, कार्यकारणी सदस्या ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. अनिता दिघे, ॲड. महेश शिंदे, हेलन पाटोळे, वीर पत्नी फरजाना शेख, अंबिका भोंदे, पुष्पा चौधरी, मनीषा औटी, विद्या काळे आदी सैनिकांच्या कुटुंबातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच अहिल्यानगर बार असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारणी संचालकांचा देखील सन्मान यावेळी पार पडला. संक्रातीचे वाण म्हणून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, कापडी पिशव्या महिलांना देण्यात आल्या. अंबिका भोंदे यांनी सैनिक कुटुंबाच्या व्यथा व समस्या मांडल्या. तर सैनिकांसाठी संदेश आते हे!… या गायलेल्या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार अनंत द्रविड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. यश सावंत, ॲड. अक्षय ठोकळ, ॲड. तुषार शेंडगे, रजनीताई ताठे, जयश्री शिंदे, आरती शिंदे, कान्हू सुंबे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, तुषार रणनवरे, संभाजी गिरी, वैशाली कुलकर्णी, प्रियांका नगरकर, ॲड. प्रशांत साळुंके, डॉ. ईसाभार्इ शेख, प्रा. सुनील मतकर, जयेश शिंदे, सुहास सोनवणे, राजकुमार चिंतामणी, अनिल साळवे, सचिन साळवी, अश्विनी वाघ, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, मीनाताई म्हसे, ॲड. विद्या शिंदे, दिलीप घुले आदींनी परिश्रम घेतले.
