पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार -कोटा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सविताताई प्रकाश कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मोर्चा मध्य मंडळ सदस्य रोहिणी कोडम, रेखा गुरूड, नंदिनी विश्वकर्मा, नारायण कोडम, बालराज सामल, विनायक मच्चा, संजय चिप्पा, प्रशांत वईटला, भूमया शेराल, किरण गरुड, उमेश इराबत्तीन, राहूल सग्गम, रेणुका न्यालपेल्ली, राणी वाघमारे, राजश्री धोंडे, सरोजना जंगम, मेघा दासी आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रोहिणी कोडम म्हणाल्या की, महिला मोर्चाच्या मध्य मंडळ अध्यक्षाची जबाबदारी उत्तमपणे पेलवून केलेल्या कार्याबद्दल सविताताई कोटा यांना भाजपच्या शहराची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बालराज सामल म्हणाले की, भाजपच्या माध्यमातून सविताताई कोटा यांनी नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले. तर भाजपच्या विविध कल्याणकारी योजना व पक्षाचे ध्येय-धोरण आणि विचार घरोघरी पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडविण्याचे काम ते सातत्याने करत आहे. त्यांना मिळालेले पद हे त्यांच्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सविताताई कोटा म्हणाल्या की, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले. पक्षाने दिलेली जबाबदारी उत्तमपणे पेलविणार असून, शहरात मोठ्या प्रमाणात महिलांचे संघटन उभे करुन पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे कार्यकारणीत संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन, ही कार्यकारणी सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन पुढे जाणारी असल्याचे स्पष्ट केले.