चर्मकार समाजाच्या मेळाव्यात समाज एकवटला; जय संत रोहिदास! च्या घोषणांनी दणाणले सभागृह
निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद, सामुदायिक विवाह सोहळ्याची घोषणा
निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद, सामुदायिक विवाह सोहळ्याची घोषणा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीवन जगण्यासाठी जे कौशल्य, ज्ञान आवश्यक आहे, हे जीवनाचे तत्त्वज्ञान आत्मसात केले पाहिजे. पूर्वी संत महंत यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या सरळ सोपे भाषेत सांगितले. आज ही स्वच्छता शिकवावी लागते, ती संत गाडगे महाराजांनी कित्येक वर्षांपूर्वी हातात झाडे घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. भगवद्गीतेचा सार एका ओळीत परोपकार हा आहे. माणसाने माणसाला केलेली मदत परोपकार ठरते. धर्माचे सार नाही समजले ते ज्ञान व्यर्थ आहे. भुकेलेल्या अन्न, तहानलेल्या पाणी व माणुसकीची शिकवण संत रोहिदास महाराजांनी दिली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजाचा मेळावा व निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे बोलत होते. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यासाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले, मनपा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम, वधू-वर व पालक परिचय समितीचे अध्यक्ष संजय कानडे, राज्य उपाध्यक्ष रामदास सातपुते, उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, रावसाहेब कानडे, अरविंद कांबळे, भारत चिंधे, देवराम तुपे, विक्रम गुजर, अनिलकुमार शिंदे, श्रीपती ठोसर, कवी सुभाष सोनवणे, भाऊसाहेब आंबेडकर, मनिष जतकर, महिला जिल्हाध्यक्ष रुख्मिणी नन्नवरे, संगिता वाकचौरे, अर्जुन वाघ, सुरेखा देवरे, मिनाताई नन्नवरे, मिनाक्षीताई साळवे, लताताई वाघमारे, मिनलताई माने, हेमलता कांबळे, रुपेश लोखंडे, विनोद कांबळे, रामराव ज्योतिक, मच्छिंद्र दळवी, राजेंद्र धस, प्रतिभा खामकर, अरुण गाडेकर, आण्णासाहेब खैरे, तुकाराम शेंडे, नितीन उदमले, गणेश नन्नवरे, मनिष कांबळे आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे घार्गे म्हणाले की, जे माणसं देत राहतात, परोपकार करतात तेच माणसे समाजाच्या लक्षात राहतात. गरजूंची गरज ओळखून मदत केली तर ती सार्थकी लागते. संत रोहिदास महाराजांनी जीवनाचा मार्ग दाखविला असून, त्या मार्गावर चालण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांची आरती करुन त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल व समाजातील निधन झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात संजय कानडे यांनी लग्नसाठी वधु-वर व त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येत आहेत. समाज विखुरला गेला असल्याने या मेळाव्याची गरज पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, पूर्वी कमी वयात लग्न व्हायचे, मात्र आता तिशीनंतर देखील लग्न जमताना दिसत नाही. करियर महत्त्वाचे असले, तरी समाजाने देखील योग्य वयात मुला-मुलींचे लग्न लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिमल निकल यांनी जयंतीच्या समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
संजय खामकर म्हणाले की, चर्मकार विकास संघ समाजाची गरज अोळखून दरवर्षी निशुल्क वधू-वर मेळावा घेत आहे. यामुळे अनेकांची एजंटगिरी बंद झाली. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजत एकत्र येत आहे. हे मेळावे होत असताना पालकांनी प्रत्यक्ष मुला-मुलींना मेळाव्यात आणण्याची गरज आहे. ही मानसिकता बदलल्यास लग्न जुळविताना सोयीचे होणार आहे. जयंती सोहळ्यासाठी समाजातील पुढारलेल्या लोकांनी सर्व परीने मदत करण्याची गरज आहे. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.
दिवसभर चाललेल्या या वधू-वर मेळाव्यात मोठ्या संख्येने चर्मकार समाज एकवटला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. आभार सुभाष सोनवणे यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी वधू-वर पालक परिचय समितीचे पदाधिकारी,सदस्यांनी परिश्रम घेतले. सर्व उपस्थित समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजभूषण पुरस्कार प्रदान
सामाजिक कार्याबद्दल प्रविण केदारे व बाबूराव चिंधे यांना समाजभूषण तसेच पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल राजेंद्र वाघ यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
