प्रतिष्ठानच्या वतीने भिंगारदिवे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांनी यश संपादन केले. आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील रहेमत सुलतान सभागृहात झालेल्या या गायन स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यातील गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये प्रेम रोगी या सिनेमातील मै हू प्रेम रोगी… हे सदाबहार गीत सादर करुन उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
भिंगारदिवे यांना मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबिद हुसेन यांच्या हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सईद खान, जावेद मास्टर आदींसह कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.