रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ
विकास आराखडा तयार करून प्रभागाचा कायापालट करण्याचे काम सुरु -अनिल शिंदे
नगर (प्रतिनिधी)- शहराला लागून असलेल्या कायनेटीक चौक, नगर-कल्याण रोड परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे. या विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. फक्त रस्ते, पाणी व वीजेचे प्रश्न न सोडविता प्रभागातील विकास आराखडा तयार करून कायापालट करण्याचे काम सुरु असल्याचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी सांगितले.
शहराच्या कायनेटीक चौक येथील लक्ष्मीकृपा सोसायटी, प्रियंका कॉम्प्लेक्स परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोपानराव कारखिले, आर.आर. पाटील, रावसाहेब चौधरी, सुरेश गुंदेचा, लक्ष्मण शेळके, आसाराम बर्डे, शेषराव आपटे, करपे, अशोक जाधव, सागर पंडित, निलेश शेळके, ज्ञानेश्वर चंदन, अशोक डोळस, सुनील कवडे, काका वाळके, राजेंद्र घोडके, बोराशेठ संतोष उरागे, सुरेश मोरे, जोशी, अरुण रोहकले, फंड, मिलिंद रासकर, कोरेकर, उजागरे, जोशी, भंडारी, शिंदे आदींसह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे शिंदे म्हणाले की, कायनेटीक चौक परिसरातील वसाहतींमध्ये पावसाळ्यात घरा बाहेर पडणे देखील अवघड होते. मात्र तेथील रस्त्यांचे कामे मार्गी लाऊन प्रत्येक कुटुंबाच्या घरा पर्यंत रस्ते उपलब्ध होत आहे. या भागाचा झपाट्याने विस्तार होत असताना नव्याने झालेल्या वसाहतीमध्ये देखील रस्ते उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवस्थीत रस्ता नसल्याने लक्ष्मीकृपा सोसायटी परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेऊन नगरसेवक अनिल शिंदे यांनी जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.