• Thu. Oct 30th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग व थॅलेसिमिया तपासणी शिबिरास प्रतिसाद

ByMirror

Jun 14, 2024

समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यदूतची भूमिका -राजेंद्र भंडारी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यदूतची भूमिका पार पाडत आहे. नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी येथे घेतली जाते. अतिदक्षता विभाग, सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज अद्यावत यंत्रणा व तज्ञ डॉक्टर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जात असून, या सेवा कार्यात जोडले गेल्याचा समाधान मिळत असल्याची भावना उद्योजक राजेंद्र भंडारी यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. हेमचंद ताराचंद भंडारी यांच्या पुण्यस्मरणनिमित्त मोफत बालरोग व थॅलेसिमिया तपासणी शिबिराचे उद्घाटन बनारसीबाई भंडारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजेंद्र भंडारी बोलत होते. यावेळी लिलाबाई भंडारी, संजय भंडारी, विजय भंडारी, रविंद्र भंडारी, चंद्रकांत भंडारी, संदीप भंडारी, सुमनबाई भंडारी, सचिन भंडारी, सागर भंडारी, विपूल भंडारी, आदित्य भंडारी, सुराज भंडारी, निरज भंडारी, लौकिक भंडारी, नमन भंडारी, धरमचंद भंडारी, रसिक भंडारी, नरेंद्र चोरडीया, अभिषेक बोथरा, यश गुगळे, अंजू भंडारी, सुधीर झालानी, संतोष बोथरा, प्रकाश छल्लानी, डॉ. प्रकाश कांकरिया, बाबूशेठ लोढा, माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, निखीलेंद्र लोढा, बालरोग तज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ. रुपेश सिकची, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. लिझा बलसारा आदी उपस्थित होते.


पुढे उद्योजक राजेंद्र भंडारी म्हणाले की, सेवा कार्यात भंडारी परिवार नेहमीच योगदान देत आहे. आरोग्यसेवा समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटल करत असून, या सेवा कार्यात भंडारी परिवाराचे योगदान राहणार असल्याचे सांगितले. तर कॅन्सरच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, भंडारी बंधूंनी वडिलांची पुण्यतिथी आरोग्य सेवेच्या उपक्रमाने साजरी करुन गरजूंना आधार देण्याचे काम केले आहे. उच्च सुशिक्षित असलेला हा परिवार सेवा कार्याशी जोडला गेलेला आहे. केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जगभरात त्यांचे नाव आहे. हॉस्पिटलमध्ये ना नफा, ना तोटा या तत्वावर आरोग्यसेवा सुरु असून, हा परिवार या सेवेशी जोडल्या गेल्याने विविध प्रकल्पाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सुमनबाई भंडारी म्हणाल्या की, स्व. हेमचंद भंडारी यांनी मोठ्या कष्टाने विश्‍व निर्माण केले. परिस्थितीची जाणीव ठेऊन गरजू घटकांना नेहमीच त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या संस्काराने भंडारी परिवार सेवाकार्यात योगदान देत आहे. ते ज्या थॅलेसिमिया या आजाराने ग्रासले त्याच आजाराचे शिबिर घेऊन सामाजिक योगदान देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्रेयस सुरपुरे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत असून, अल्पदरात सेवा दिली जात आहे. पुणे सारख्या शहरातून देखील सर्वसामान्य कुटुंबातील बालके उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. मोठ्या शहरातील खर्चिक आरोग्य सुविधा परवडत नाही, त्याच दर्जाची आरोग्य सुविधा आपल्या शहरात अल्पदरात उपलब्ध होत आहे. 26 बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या श्‍वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी.एस. (श्‍वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार, जन्मजात आजारांचे निदान व उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स रे, पॅथोलॉजी लॅब व डायलिसिस मशीन द्वारे सेवा उपलब्ध आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असून, दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 2021 पासून थॅलेसेमिया डेकेअर आहे. या डेकेअरमध्ये 150 हून अधिक मुले दरमहा नियमित रक्तसंक्रमण घेत आहेत. मोफत रक्त संक्रमण, मोफत तपासणी आणि औषधोपचार अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र जेथे मोफत ल्युकोफिल्टर देण्यात आल्याची माहिती डॉ. लिझा बलसारा यांनी दिली. या शिबिरात 85 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. तर 90 थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांची उपचारासाठी नाव नोंदणी झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *