राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी वेधले लक्ष
नगर (प्रतिनिधी)- घरकुल योजनेचा लाभ शहरातील लाभार्थ्यांना प्रभावीपणे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी घरकुल योजनेबाबत उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी युवक प्रवक्ता किरण घुले, दीपक वाघ, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, केतन गोरे, रोहित सरना, मंगेश शिंदे, सुदर्शन गोरे, हृषीकेश जगताप, गौरव हरबा, राजू मकासरे, कुणाल ससाणे, सचिन डेरे, स्वप्नील कांबळे, ओंकार मिसाळ, बोगवत, आशुतोष पानमळकर, अरबाज शेख, कृष्णा शेळके, अमित बडे, प्रवीण खंडागळे, पंकज शेंडगे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने चालवलेली घरकुल योजना अत्यंत लाभदायक अशा पद्धतीने राज्यभर सुरू आहे. गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होत आहे. परंतु अहिल्यानगर शहरामध्ये तितक्या प्रभावीपणे ही योजना कार्यरत नसून, शहरातील नागरिकांना याचा लाभ मिळत नाही. तरी लाभार्थ्यांना प्रभावीपणे याचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करून उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.