अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेचे सचिव रेहान काझी यांची ऑल इंडिया कौमी तंजिम या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार तारिक अन्वर यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काझी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग मा. अध्यक्ष मुनाफ हकीम, मा. आमदार अमीन पटेल आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.