क्रीडा समितीच्या वतीने सत्कार
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. नगर तालुका क्रीडा समिती 2025-26 ची बैठक वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे नुकतीच पार पडली. यावेळी डोंगरे यांच्याकडे पुन्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रीडा समितीच्या वतीने अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी दीपक दरेकर, प्रताप बांडे, भगवान मते, सचिव रवींद्र हंबर्डे, बाबासाहेब म्हस्के, बापूसाहेब जगताप, विष्णू बारगल, मनीषा पुंडे, अभिजीत जगताप, पल्लवी जगताप, गणेश खुडे, दत्ता नारळे, शिरीष टेकाडे, दादासाहेब दुसुंगे, बाळासाहेब मुळे, बळीराम सातपुते, विजय जाधव, राजेंद्र कोतकर, दिपक ठाणगे, दिपाली पाटकर, बाळासाहेब शिंदे, पल्लवी शेळके, बाळासाहेब बोडखे,मिलिंद थोरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांचे क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्य सुरु आहे. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना विविध स्पर्धेच्या माध्यमातून चालना देण्याचे काम ते करत असतात. क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.