• Thu. Apr 24th, 2025

राजेंद्र कंत्रोड यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सत्कार

ByMirror

Apr 22, 2025

रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी आले निवडून

नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल राजेंद्र कंत्रोड यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तारकपूर येथील लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात साहित्यिक तथा कवी इंजी. देवेंद्रसिंह वधवा आणि घर घर लंगर सेवेचे जनक जनक आहुजा यांनी राजेंद्र कंत्रोड यांचा सत्कार केला. याप्रसंगी मनिषाकौर वधवा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, मुन्ना जग्गी, राजू जग्गी, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते.


इंजी. देवेंद्रसिंह वधवा म्हणाले की, राजेंद्र कंत्रोड हे केवळ सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व असून, सामाजिक क्षेत्रातही ते कायम सक्रिय असतात. गरीब व गरजूंना मदत करणे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यशैली आहे. संचालक म्हणून त्यांच्या निवडीने संस्थेचा विकास वेगाने होईल, असा आमचा विश्‍वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जनक आहुजा म्हणाले की, आपल्या समाजात सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. राजेंद्र कंत्रोड यांनी त्या जबाबदारीचे भान ठेवून काम करत आहे. त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा संस्थेला व संचालक मंडळाला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *