निखारे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रेमदान हडको येथील सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला पुणे हिंजेवाडी येथील व्यावसायिक जितेंद्र निखारे यांनी भेट दिली. यावेळी ट्रस्टच्या वतीने सय्यद साबीर अली यांनी निखारे यांचा सत्कार करुन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी सय्यद मेहंदी अली, योगेश, सय्यद जाफर अली आदी उपस्थित होते.
जितेंद्र निखारे हे पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत प्रिन्सिपल आर्किटेक्चर या पदावर कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षापासून ते ट्रस्टशी जोडले आहेत. तर व्यावसायिक कामासोबत ते समाजसेवेत सुद्धा योगदान देत आहे. ते सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करत असतात. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाने भरपूर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळाली असल्याचे स्पष्ट करुन त्यांचा सामाजिक कार्याचे सय्यद साबीर अली यांनी कौतुक केले.
जितेंद्र निखारे यांनी सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला भेट देऊन मानसिक समाधान मिळते. ट्रस्टच्या माध्यमातून चांगले लोक जोडले गेले असून, नगर शहरात देखील गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.