उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; भिंगारमधील शोभायात्रेचे स्वागत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान महावीर जन्म कल्याणक दिन (महावीर जयंती) निमित्ताने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पशु-पक्ष्यांप्रती करुणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असताना पक्ष्यांना पाणी व अन्न मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथील झाडांवर प्लास्टिकच्या भांड्यांद्वारे पाणी व धान्याची व्यवस्था करण्यात आली.

भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसेच्या आणि सर्व जीवांप्रती प्रेमाच्या शिकवणीच्या विचाराने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच, भिंगार शहरातून महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करून सेवा उपक्रम पार पडला.
हा उपक्रम दिलीप गुगळे, सचिन चोपडा, संतोष लुणिया तसेच ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. यावेळी रमेश वराडे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, दिलीप ठोकळ, दिपकराव धाडगे, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, मनोहर दरवडे, संजय भिंगारदिवे, दीपकराव घोडके, सुहास देवराईकर, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, सुभाष पेंढुरकर, दीपक मेहतानी, अनिल सोळसे, अनिल हळगावकर, किरण फुलारी, सीए अभिषेक बिहाणी, ॲड. रोहित भंडारी, मयूर गांधी, सुयोग चोपडा, राजू कांबळे, दशरथ मुंडे, जयराम मेहतानी, मुन्ना वाघस्कर, संतोष हजारे, ताराचंद ठोकळ, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, योगेश हळगावकर, प्रशांत चोपडा, रामनाथ गर्जे, प्रज्योतसिंग सागू, दीपक अमृत, विशाल भामरे, विकास निमसे, सचिन कस्तुरे, सुरेखा आमले, नीता देवराईकर, मिनाताई परदेशी, प्रांजली सपकाळ, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, संगीता घोटे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, “भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. मानवाने फक्त स्वतःपुरते न जगता इतर जीवजंतूंचाही विचार करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्षी त्रस्त होतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. सातत्याने सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देऊन ग्रुपचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलीप गुगळे म्हणाले की, महावीर जयंतीसारख्या पवित्र दिवशी समाजाला काहीतरी सकारात्मक संदेश देणे गरजेचे आहे. पशु-पक्ष्यांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात अशा प्रकारची व्यवस्था केली तर हजारो पक्ष्यांचे प्राण वाचू शकणार असल्याचे ते म्हणाले.
सचिन चोपडा म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षी आणि प्राणी यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी पाणी व अन्नाची सोय करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या उपक्रमातून युवकांमध्येही सामाजिक जाणीव निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे म्हणाले की, जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी ‘अहिंसा परमो धर्म’ हा संदेश देत संपूर्ण जगाला दया, क्षमा आणि शांततेचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचे पालन करत पशुसंवर्धनासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्याच झाडांवर आता पशु-पक्ष्यांसाठी कायमस्वरूपी पाणी व अन्न-धान्याची व्यवस्था करण्यात येणार असून, संपूर्ण उन्हाळाभर दररोज ही सेवा सुरू ठेवण्याचा संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
