शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापिका उज्वला सुनिल धस-आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्या शिक्षणशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्या आडसुळ बी.एड. कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रा.डॉ. गोकुळ मोरे आणि पती प्रा. सुनिल धस यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.