डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथील प्रा. डॉ. बाबासाहेब रामदास जाधव यांना शिक्षक दिनानिमित्त पुणे येथे डॉ. पी.डी. पाटील यंग रिसर्चर अवॉर्ड 2024 ने गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जाधव यांना मानांकन, स्मृतिचिन्ह व रोख 30 हजार रुपये पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात आले.
प्रा.डॉ. जाधव हे निमगाव वाघा येथील प्रगतशील शेतकरी तथा व्यावसायिक आनंदा जाधव यांचे पुतने असून, ते पुणे येथील नामांकित डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, आनंदा जाधव, बाबूराव जाधव, भाऊ जाधव, एकनाथ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, गोकुळ जाधव, डॉ. विजय जाधव, बापू फलके यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
