• Sun. Mar 30th, 2025

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा होणार प्राइड ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्डने सन्मान

ByMirror

Mar 18, 2025

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्राइड ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका सुप्रिया चौधरी, सारिका शेलार व संचालक प्रविण साळवे यांनी दिली.


ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनचा नॅशनल अवॉर्ड प्रदान सोहळा व एक दिवसीय कार्यशाळा महाबळेश्‍वर येथील द बाईक शांती व्हिला येथे 18 मे रोजी सकाळी होणार आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव आणि कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


या पुरस्कार सोहळ्यात कलाविष्कार पुरस्कार, राष्ट्रीय खेल आयकॉन, राष्ट्रीय आदर्श अध्यापक पुरस्कार, सोशलवर्क आयकॉन पुरस्कार, राजनीतिक प्रेरणा पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, राष्ट्रीय सुजलाम सुफलाम ग्राम पुरस्कार, राष्ट्रीय आध्यात्मिक कार्य सन्मान पुरस्कार, राष्ट्रीय आरोग्य आयकॉन अवॉर्ड ऑफ इंडिया, आयकॉन ऑफ सोशल वर्किंग पुरस्कार, राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार, प्रशासनिक सेवा सहयोग पुरस्कार, राष्ट्रीय कृषी आयकॉन पुरस्कार, राष्ट्रीय पत्रकारिता, राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. पुरस्कार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.


तसेच समाजसेवेत नवी दिशा व भरीव काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये एनजीओ विविध कागदपत्रे व उपयोगिता एनजीओ प्रकल्प निर्मिती व फंड रेझिंग, कार्यपद्धती व असेसमेंट, गव्हर्मेंट प्रोजेक्ट, कागदपत्रे व कार्यपद्धती, सीएसआर प्रोजेक्ट, कागदपत्रे व कार्यपद्धती, एनजीओ स्वयंसेवक व संस्था, एनजीओ सदस्य नोंदणी व सहभाग, एनजीओ सोशल मीडिया मार्केटिंग व फंड रेझिंग या विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे.


कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी आवश्‍यक असून, https://forms.gle/J1Ne4gh6YY83c5oo7या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे म्हंटले आहे. तर अधिक माहितीसाठी 9423673591 व 9021066491 या नंबरवर संपर्क साधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *