• Thu. Jan 22nd, 2026

इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना

ByMirror

Dec 5, 2024

दररोज होत आहे कीर्तन आणि प्रार्थना; सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- बांगलादेशात सुरु असलेला हिंसाचार थांबण्यासाठी अहिल्यानगर मधील इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेसाठी कीर्तन करुन प्रार्थना पार पडत आहे. या सामुहिक प्रार्थनांद्वारे इस्कॉन शांती, करुणा आणि परस्पर सन्मान यांचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संपूर्ण जगभरातील भक्तांना बांगलादेशातील शांती आणि ऐक्याकरिता प्रार्थनेसाठी एकत्र आणत आहे. संपूर्ण जगभरातील इस्कॉनच्या केंद्रांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून दैवी कृपेसाठी प्रार्थना केली जात आहे.


अहिल्यानगरमधील इस्कॉन केंद्रही या जागतिक उपक्रमामध्ये सहभागी झाले असून, रोज कीर्तनांचे आयोजन करून बांगलादेशातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जात आहे. सर्व नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.


भगवंत सर्वांना समान नजरेने पाहतात आणि आपल्या सर्व लेकरांवर प्रेम करतात. चला, आपण एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून प्रार्थना करूया, जेणेकरून प्रत्येक धर्मातील लोक समजूतदारपणे एकत्र राहतील व शांततेने वागतील, असे इस्कॉन अहिल्यानगरच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *