सामूहिक ध्यान करुन ईश्वरी शक्तीला साकडे
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी साधकांनी सामूहिक ध्यान साधून ईश्वरी शक्तीला साकडे घातले.
ही प्रार्थना सावेडी रोडवरील महावीर नगर येथील मुख्य केंद्रात आयोजित करण्यात आली होती. राजयोगिनी राजेश्वरी दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ब्रह्मकुमारी सुप्रभा दीदी, ॲड. निर्मला चौधरी, संगिता देडगावकर, सिताराम भाई, व्यंकटेश भाई, दीपक भाई, आदिनाथ भाई, ॲड. सुमेध चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने साधक सहभागी झाले होते.
राजेश्वरी दीदी म्हणाल्या की, अरुणकाका जगताप हे केवळ राजकीय क्षेत्रातील नेते नसून, धार्मिक व सामाजिक कार्याशीही त्यांनी आपली नाळ जोडलेली आहे. आमच्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या या मुख्य केंद्राच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाला होता. त्यामुळे अरुणकाका आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रार्थनेदरम्यान सामूहिकरित्या योग व ध्यान साधून अरुणकाकांच्या स्वास्थ्यासाठी ईश्वरी शक्तीला प्रार्थना करण्यात आली.ॲड. निर्मला चौधरी यांनी दररोज ध्यान केंद्रात अरुणकाकांच्या स्वास्थ्यासाठी विशेष ध्यान साधना करण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती लवकर पूर्ववत व्हावी, यासाठी संपूर्ण साधक परिवार सातत्याने प्रार्थना करणार असल्याची माहिती दिली.