• Tue. Jan 27th, 2026

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपने केला महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

ByMirror

Mar 9, 2024

विविध क्षेत्रातील 21 कर्तृत्ववान महिलांचा गौरव

महिला दिनानिमित्त सावेडी शाखेचा प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 21 कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. तर यावेळी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धेचा महिलांनी मनमुरादपणे आनंद लुटला.


मागील पंचवीस वर्षापासून शहरात महिला सक्षमीकरण व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या सावेडी येथे दुसऱ्या शाखेचे प्रारंभ करण्यात आले. नगरसेविका संध्या पवार व दिपाली बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्षा ज्योती कानडे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्ष कविता दरंदले, अनिता काळे, विद्या बडवे, लता कांबळे, मीरा बारस्कर, शकुंतला जाधव, हिरा शहापुरे, माया कोल्हे, छाया राजपूत, वंदना गोसावी, प्रतिभा भिसे, सुजाता पुजारी, स्वाती गुंदेचा, रजनी भंडारी, नीता प्रथमशेट्टी, सोनी पुरनाळे, अर्चना बोरुडे, मनीषा कदम आदी उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी मागील अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. सावेडी येथील मोठ्या संख्येने महिला ग्रुपशी जोडल्या गेल्या असून, त्यांच्यासाठी महिला दिनानिमित्त स्वतंत्र्य शाखेचे प्रारंभ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिपाली बारस्कर म्हणाल्या की, महिलांनी जीवनात पुढे जाताना महिला असल्याचा मनातील न्यूनगंड काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते. महिला सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करत असताना एकमेकांच्या पंखांना बळ देण्याचे काम महिलांनी करण्याचे त्यांनी आवाहन केले.


संध्या पवार यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिलेला महिलापण सांभाळावे लागते. नंतर इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कर्तुत्वाने उभे राहताना स्वाभिमान व आत्मविश्‍वास वेगळ्या दिशेने घेऊन जातो. स्वतचे अस्तित्व निर्माण करा, कोणतेही काम छोटे-मोठे नसते. संसार सांभाळून आपल्या कलागुणांना वाव देण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमात लता भुतडा, अनिता काळे, मंगल चोपडा, छाया बंडगर, मीनाक्षी जाधव, मीरा बेरड, कृष्णा पवार, जयश्री पुरोहित, उषा गुगळे, ज्योती भोगाडे आदींसह विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या 21 महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या होत्या. विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमास ज्योती कानडे व कविता दरंदले यांचे प्रायोजकत्व लाभले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा संकलेचा यांनी केले. आभार विद्या बडवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघना मुनोत, राखी जाधव यांनी परिश्रम घेतले. उपस्थित महिलांना जयाताई गायकवाड यांच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *