• Wed. Oct 15th, 2025

महाशिवरात्रीनिमित्त तारकपूरला भाविकांना प्रसाद वाटप

ByMirror

Feb 26, 2025

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम

हिंदू धर्माच्या सण-उत्सवातून संस्कृती जपण्याचे काम करावे -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समधान सोळंकी, गजेंद्र भांडवलकर, संजय आहुजा, बबलू खोसला, किशोर कंत्रोड, विकी कंत्रोड, करन आहुजा, मनोचा, आंचल कंत्रोड, गंभीर, बल्लू सचदेव आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरुनानक देवजी सेवा ग्रुप सेवाभावाने कार्य करत आहे. हिंदू धर्माच्या सण-उत्सवातून संस्कृती जपण्याचे काम करावे. युवकांनी आपले उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होण्यासाठी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.


जनक आहुजा यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला व सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *