युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे जिल्हा पोलीस प्रशासनाचा युवक काँग्रेसच्या वतीने आभार मानण्यात आले.
मोहरम उत्सव दरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मोहरमची विसर्जन मिरवणुक संपताच सावेडी गावठाण येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व शहराचे विभागीय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिन शेख, समीर शेख, अल्लाउद्दीन शेख, आयन शेख, समीर सय्यद, आसिफ शेख, नासिर शेख, सलीम शेख, सोनू पासवान आदि उपस्थित होते.