वृक्षारोपण व संवर्धनासाठी राष्ट्रवादी युवकचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी यांचा पुढाकार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार टेकडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भिंगारची टेकडी हिरवाईने फुलविण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वृक्षारोपण अभियानाचे प्रारंभ ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आले. यावेळी सुदाम मोरे, किशोर उपरे, अशोक राहिंज, दीपक राहिंज, मच्छिंद्र मंदिलकर, अक्षय भांड, रवी राहिंज, संजय देवतरसे, गणेश देवतरसे, नितीन भांड, मुकुंद भांड, कमलेश राऊत, मिलिंद लालबोंद्रे, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, दीपक लिपाने, ओम भंडारी, मच्छिंद्र देवतरसे, रोहित राहिंज, किरण राहिंज, रोहन पादिर, विशाल राहिंज, जयदेव तरसे, नवनाथ मोरे, संदीप भांड, अनिल वाघ, अक्षय नागपुरे, अलका भंडारी, द्वारका राहिंज, राणी विधाते, मीना मोरे, अंकिता फुलारी, वाघताई, महेश वाघस्कर आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भिंगार राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून राबविण्यात आलेली वृक्षारोपण चळवळ प्रेरणा देणारी आहे. उजाड परिसर, डोंगररांगा, माळरान व टेकड्या हिरावाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवम भंडारी म्हणाले की, सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने या सामाजिक चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. आज केलेले वृक्षरोपण आपल्या भावीपिढीच्या कल्याणासाठी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भिंगार टेकडी परिसरात विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. सकाळ, संध्याकाळ या परिसरात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली आहे. तर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी ट्री गार्ड उपलब्ध करुन दिले आहे.