पहिल्याच निकालात तीन विद्यार्थ्यांचा 95 पर्सेंटाइलचा मानांक
मनीष मुटकुळे जिल्ह्यात प्रथम; संस्थेच्या राज्य गुणवत्ता यादीत अव्वल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिजिक्सवाला अहिल्यानगर केंद्राच्या विद्यार्थ्यांनी जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मेन्स 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. पहिल्याच वर्षाच्या निकालात तीन विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.
यामध्ये मनीष सुनील मुटकुळे याने 99.56 पर्सेंटाइल मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेच्या गुणवत्ता यादीत राज्यातही अव्वल स्थान मिळवले आहे. त्याचप्रमाणे जगताप आदित्य संदीप याने 95.87 पर्सेंटाइल तर सोनवणे समर्थ वासुदेव याने 95.46 पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी फिजिक्सवाला अहिल्यानगरच्या नियमित दोन वर्षांच्या बॅचमधील असून या केंद्राचा हा पहिलाच अधिकृत निकाल आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे संस्थेच्या शिस्तबद्ध नियोजनाची व गुणवत्तापूर्ण अध्यापनाची प्रचिती आली आहे.
मनीष मुटकुळे याने भौतिकशास्त्र विषयात 99.18 तर गणित विषयात 99.78 पर्सेंटाइल मिळवत विषयवार उत्कृष्ट कामगिरी केली. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि अचूक मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, नियमित चाचणी मालिका, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शन विश्लेषण यामुळे त्यांच्या तयारीला योग्य दिशा मिळाली. योग्य रणनीती आणि सातत्यपूर्ण सराव हे यशाचे मुख्य सूत्र ठरले.
फिजिक्सवाला अहिल्यानगरचे संचालक हरीश तावरे म्हणाले, “पहिल्याच निकालात तीन विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणे ही आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची पावती आहे. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देत परिणामकेंद्रित तयारीवर भर देतो.”
या निकालामुळे अहिल्यानगरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन क्षेत्रात फिजिक्सवालाची भक्कम ओळख निर्माण झाली आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून जागा मर्यादित आहेत. यावर्षापासून एमएचटी-सीईटी हा अभ्यासक्रमही उच्च गुणवत्तेसह सुरू करण्यात आला आहे. तसेच नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटी हे सर्व अभ्यासक्रम पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मेस व वाहतूक सुविधा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे केंद्रप्रमुखांनी स्पष्ट केले.
