• Sat. Nov 1st, 2025

दिल्लीच्या योग कार्यक्रमात अहमदनगर शहरातील प्रतिनिधींचा सहभाग

ByMirror

Jun 21, 2024

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात शुक्रवारी (दि.21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात शहरातील स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

यामध्ये नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, माहेर फाउंडेशन आदी स्वयंसेवी संघटनेचे ॲड. महेश शिंदे, रजनीताई ताठे, जयश्री शिंदे, बाळू बनसोडे, दिनेश शिंदे, आरती शिंदे, जयेश शिंदे, भारती शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *