• Tue. Jul 1st, 2025

जुने बस स्थानक येथील स्वच्छता अभियानात महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग

ByMirror

Sep 30, 2024

माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून चकाकले बस स्थानक

रोगराई मुक्तीसाठी स्वच्छतेचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा येथील जुने बस स्थानक परिसरात माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात संस्थेचे सदस्यांसह महाविद्यालयीन युवक-युवती, बस स्थानकचे अधिकारी, चालक-वाहक व प्रवासी देखील सहभागी झाले होते. उपस्थितांनी हातात झाडू व स्वच्छतेचे साहित्य घेऊन बस स्थानकचा परिसर चकाचक स्वछ केला. यावेळी रोगराई मुक्तीसाठी स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.


या अभियानाचे प्रारंभ बस स्थानक प्रमुख बाळासाहेब भालेराव व वाहतूक नियंत्रक बबनराव झोंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना बनकर, सचिव सिमोन बनकर, साक्षी बनकर, जान्हवी जाधव, दीपिका देशमुख, सोहम बल्लाळ, प्रियांशु द्विवेदी, प्रतीक भालसिंग, ज्ञानेश्‍वरी कांगुडे, स्नेहल उदार, अंजली पाटोळे, विवेक ढोले, वाहक प्रमोद कराळे, गणेश राऊत, प्रवीण जाधव, परशुराम जाधव, इरफान शेख, नितीन गायकवाड, मिना जाधव आदी उपस्थित होते.


स्थानक प्रमुख बाळासाहेब भालेराव म्हणाले की, निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची आहे. स्वच्छ झालेला सार्वजनिक परिसर सदृढ आरोग्याची नांदी ठरणार आहे. बस स्थानक हे सर्वांचे असून, त्याला स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुटुंबाप्रमाणे सर्व बस स्थानक, सरकारी कार्यालय व इतर परिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.


संस्थेच्या अध्यक्षा नयना बनकर म्हणाल्या की, अस्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकनगुन्या आदी साथीचे आजार पसरले आहे. या आजारांना रोखण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक आहे. अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होवून साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याने आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्या दृष्टीकोनाने व सुरक्षिततेसाठी स्वच्छता पाळण्याचे त्यांनी सांगितले. तर अविघटनशील व पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक असलेला प्लास्टिकचा कचरा निर्माण होण्यापासून वाचण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचे स्पष्ट केले.


या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *