• Wed. Oct 15th, 2025

गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

ByMirror

Jan 2, 2025

सामाजिक कार्याचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

सामाजिक कार्यातून ग्रामपंचायत सदस्याने उभी केलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -एन.के. ढेरंगे

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड व त्यांच्या डोंगरे संस्थेस जळगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल कामरगाव (ता. नगर) येथे झालेल्या ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधीचे गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात त्यांचा सत्कार करण्यात आला.


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून नुकतेच गणस्तरीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी नगर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन.के. ढेरंगे, प्रशिक्षक नुतन उरमुडे, अंगणवाडी पर्यवेक्षक स्वाती गवळी, ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड, सुरेश मगर, श्रीपद फलके, रामभाऊ आबुज, तुकाराम कातोरे, सोनेवाडी सरपंच दळवी, पिंपळगाव सरपंच सुलोचना नाट, गयाबाई नाट, जालिंदर आतकर, लक्ष्मण ठोकळ, हरिचंद्र बोरुडे, नलिनी भुजबळ आदी उपस्थित होते.


एन.के. ढेरंगे म्हणाले की, सामाजिक कार्यातून एका सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्याने उभी केलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची दिल्ली पर्यंत दखल घेण्यात आली, हे गौरवास्पद आहे. सामाजिक कार्यातून आदर्श गाव संकल्पनेला चालना मिळणार आहे. गावाच्या विकासासाठी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य सुरु आहे. गावाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी योगदान सुरु आहे. सर्वांच्या सहकार्याने व सहयोगातून सामाजिक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *