सर्वसामान्य कुटुंबातील मुलींने शिक्षणाद्वारे आपले कर्तृत्व सिध्द केले -हारुन खान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गंज बाजार येथील व्यापारी हमीदभाई तालेवाले यांची कन्या प्रा. आसमा हमीद खान यांना नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वतीने पीएचडी मिळाल्याबद्दल मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत तिचा गौरव करण्यात आला.
पी.ए. इनामदार शाळेचे प्राचार्य हारुन खान यांनी प्रा. आसमा खान हिचा सत्कार केला. यावेळी उपप्राचार्या फरहाना शेख, सामाजिक कार्यकर्ते जीया हमीद खान आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हारुन खान म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलींने शिक्षणाच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आसमा सारख्या कर्तृत्ववान मुली समाजातील युवक-युवतींना प्रेरणा देत असून, त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचे त्यांनी सांगितले. आसमा खान यांनी कुटुंबातील व्यक्तींकडून झालेला सन्मान हा भविष्यातील वाटचालीस ऊर्जा देणारा ठरणार आले. मुलींनी मोठे ध्येय समोर ठेवून आपली वाटचाल करण्याचा त्यांनी संदेश दिला.
आसमा खान यांनी रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटी लिटरेचर इन द युनिव्हर्सिटी सिलॅबस या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. आसमा खान सध्या धारनी (जि. अमरावती) येथील मातोश्री इंदिरा महाविद्यालय येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. खान यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इक्बाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी तिचे अभिनंदन केले.