भाकप व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्ष देशभर साजरा होत असताना शहरात शनिवारी (दि.28 डिसेंबर) धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी 11:30 वाजता होणाऱ्या या मेळाव्यात शोध पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ.कॉ.भालचंद्र कानगो यांच्य अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे, भाकपच्या राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता पानसरे उपस्थित राहणार असून, भाकप, डावी आघाडी व समविचारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर उत्तरप्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे.त्यागाची, बलिदानाची व अविरत संघर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 2024 रोजी 99 वर्षे पूर्ण करून 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पक्षातील ज्येष्ठांचा गौरव करण्यात येणार आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेक्रेटरी कॉ.ॲड. बन्सी सातपुते, सह सचिव कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संजय नांगरे, शहर सचिव कॉ. भैरवनाथ वाकळे, फिरोज शेख, भारती न्यालपेल्ली प्रयत्नशील आहेत.
