खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन; विविध प्रकारात व वयोगटात रंगणार स्पर्धा
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संलग्न ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 8 डिसेंबर) सकाळी 9 वाजता भिंगार येथील ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आवाहन करण्यात आले आहे.
वेग, कौशल्य आणि मौजमजेने भरलेल्या रोमांचक स्पर्धेत वाऱ्याच्या गतीने खेळाडू धावणार आहेत. नवोदित व अनुभवी खेळाडूंसाठी ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 5, 9, 11 व 14 वर्षा आतील व 14 वर्षा वरील खेळाडूंसाठी होणार आहे. बिगनर, क्वाड्स, व्यावसायिक इनलाइन व फॅन्सी इनलाइन या प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पदके दिली जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेची चौकशी व नोंदणीसाठी 9145152283 व 9145152286 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.