श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या शिबिराचे 16 वे वर्ष
शिबिराचा लाभ घेण्याचे नगरकरांना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या वतीने शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी मागील 16 वर्षांपासून गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विजय वासन, तरुण वासन व जनक आहुजा यांनी केले आहे.
शिबिराचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मंडळी करणार आहेत. तर मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे 27 नोव्हेंबर रोजी पाठविण्यात येणार आहे. नगर ते पुणे जाण्याचा व शस्त्रक्रियेचा खर्च मोफत राहणार आहे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था अल्पदरात करण्यात आली आहे. टाक्याचे ऑपरेशन मोफत व बिन टाक्याचे ऑपरेशन अल्पदरात केले जाणार आहे. शिबीरार्थींना नंबरचे चष्मे देखील कार्यक्रम स्थळी मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.
शिबिरार्थींना येताना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स आणने आवश्यक आहे. नांव नोंदणीसाठी जालिंदर बोरुडे 9881810333 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. या शिबिरासाठी घर घर लंगर सेवेच्या सेवादारांचे सहकार्य लाभत आहे.