• Tue. Jan 27th, 2026

मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य

ByMirror

Aug 12, 2024

नगरला पदाधिकाऱ्यांची बैठक, नियुक्तीपत्राचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील पत्रकारांची हित जोपासत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणारी, भरीव काम करणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेकडे पाहिले जाते. पत्रकार परिषदेने संघटनात्मक बाबीला प्राधान्य देत पत्रकारांसाठी नवीन उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.


अहमदनगर शहरात रविवारी (दि.11 ऑगस्ट) मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख उपस्थित होते. यावेळी अधिस्विकृती समितीचे नाशिक विभागाचे सदस्य व वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, ॲड. शिवाजी कराळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अनिल साठे, सचिन सातपुते, संदीप देहाडराय, सरचिटणीस महादेव दळे, वाजिद शेख, राजेंद्र सावंत यांच्यासह पदाधिकारी व दक्षिण जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.


मराठी पत्रकार परिषद गेल्या 90 वर्षापासून पत्रकारांसाठी काम करत आहेत. वैयक्तीक मदतीसह पत्रकारांच्या सार्वजनिक कामांतही परिषदेचा पुढाकार असतो. मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी ग्रामीण पत्रकारांसाठी विविध उपक्रमातून संघटनात्मक कामे करण्यावर भर देतात. पत्रकार हल्ला कायदा केवळ परिषदेमुळे झाला. शहरासह ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका मिळावी यासाठी परिषदेचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

पत्रकारांंसाठी सरकारी पातळीवरील योजनांचा लाभ मिळावा, पत्रकारासांठी नवीन उपक्रम आणि त्यासाठी परिषदेचे सुरु असलेले काम, नवीन सभासद नोंदणी, राज्यपातळीवरील द्वैवार्षिक अधिवेशन आदी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. संदीप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विजयसिंह होलम यांनी परिषदेची पत्रकारांसाठीची भूमिका सांगितली. महादेव दळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *