श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा उपक्रम
महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक एड्स दिनाच्या जनजागृती सप्ताहनिमित्त श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने एमआयडीसी येथे एड्सच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे आयटीआय कॉलेज, नर्सिंग कॉलेज, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व प्रयत्न नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अमृतवाहिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयापासून सकाळी या रॅलीचे प्रारंभ झाले. विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये घोषणा देत एड्स विषयी जनजागृती केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए.आर.टी विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, जिल्हा कार्यक्रमाधिकारी शिवाजी जाधव उपस्थित होते. एमआयडीसी परिसरातून मार्गक्रमण करुन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या आय.टी.आय कॉलेज येथे रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य अनिल सूर्यवंशी, उपप्राचार्य संजय काकडे, नर्सिंग कॉलेजचे नितीन निर्मल, अमोल अनाम, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे शिक्षक रेवन्नाथ गीते, डॉ. नुसरत झकारिया, डॉ.आश्लेषा शहाने, प्रयत्न नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य दिक्षा घाटविसावे, अजिंक्य पवार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सुरक्षा केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक सागर फुलारी, समुपदेशक विनय इदे, वाय.आर.जी. केयर वन स्टॉप सेंटरचे प्रकल्प व्यवस्थापक राहुल खैरनार, माजी सैनिक नीलकंठ उल्लारे आदींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

प्रास्ताविक डॉ. सुरेश घोलप यांनी केले. डॉ. विक्रम पानसंबळ यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. (एड्स) व भारताचे भविष्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तरुण पिढीने लग्न कुंडली पहाण्यापेक्षा एचआयव्ही व आरोग्याची कुंडली पाहण्याचे आव्हान केले. शिवाजी जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात एच.आय.व्ही.एड्स संसर्ग कशाप्रकारे पसरतो, तो कसा रोखला जाऊ शकतो. त्यावरील उपाय योजना, जिल्हा शासकीय रुग्णालय सामाजिक संस्था यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर विटकर यांनी केले. आयटीआय कॉलेजचे प्राचार्य अनिल सूर्यवंशी यांनी सर्व कॉलेजच्या प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहभागाबद्दल आभार मानले. या उपक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी राजेंद्र ससे व अल्पोपहारासाठी विजय देशमुख यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी अमृतवाहिनी संस्थेचे संचालक दिलीप गुंजाळ, प्रशासकीय अधिकारी सिराज शेख, अंबादास गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतदिप प्रकल्पाचे कर्मचारी सागर विटकर, प्रसाद माळी, विकास बर्डे, मच्छिंद्र दुधवडे, अजय दळवी, स्वप्नील मधे, राहुल साबळे, मंगेश थोरात, श्रीकांत शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.