खटले चालविण्याबरोबरच महिला वकील सामाजिक योगदानात अग्रेसर -ॲड. राजेश कातोरे
नगर (प्रतिनिधी)- न्यायधार व महिला वकिलांच्या वतीने अंबिका महिला बँकेच्या उपाध्यक्षपदी ॲड. विजया काकडे व बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड. जयाताई पाटोळे यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात महिला बार रुममध्ये झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे पाटील, सचिव ॲड. संदीप बुरके, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा ॲड. निर्मला चौधरी, ॲड. स्वप्नाली काकडे, ॲड. सुमेध चौधरी, ॲड. अजित रोकडे, ॲड. निरुपमा काकडे, ॲड. गुलशन धारानी, ॲड. प्रज्ञा उजागरे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. आशा गोंधळे, ॲड. रिजवाना खान, ॲड. मीना भालेकर, ॲड. दीक्षा बनसोडे, ॲड. शुभांगी चौधरी, ॲड. पूजा दुग्गड आदींसह महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ॲड. राजेश कातोरे पाटील म्हणाले की, महिला वकील न्यायालयात खटले चालविण्याबरोबरच सामाजिक योगदानात देखील अग्रेसर आहेत. महिला वकील शोषितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून दीन-दुबळ्या वर्गाला आधार देण्याचे काम करत आहे. महिला वकीलांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
ॲड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, महिला वकील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. ॲड. विजया काकडे यांनी सरकारी वकील म्हणून काही वर्षे काम केले आहे. तर मागील 35 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. अंबिका महिला बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ते योगदान देत आहेत. तसेच बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड. जयाताई पाटोळे या देखील मागील 30 वर्षापासून सिव्हिल व फौजदारी प्रकरणे चालवून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. समाजाच्या जडणघडणीत महिला वकीलांची भूमिका देखील महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. काकडे व ॲड. पाटोळे यांनी कुटुंबातील सदस्यांनी पाठिवरती दिलेली शाबासकीची थाप ने आनखी जबाबदारी वाढली असून, अधिक चांगल्या पध्दतीने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. या सन्मानाने भारावले असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे यांनी केले. आभार करुणा शिंदे यांनी मानले.