जनसेवेचा वसा घेऊन शिवसेनेचे राजकारण -सचिन जाधव
मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले. गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी समाजकार्य केले. त्यांच्या विचाराने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात शिवसेनेचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख असून, जनसेवेचा वसा घेऊन राजकारण सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी सर्वात अगोदर धावून जाणारे शिवसैनिक असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी नगरसेवक संभाजी कदम, संजय शेंडगे, दत्ता कावरे, युवकचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, अशोक दहिफळे, राम वडागळे, अविनाश भिंगारदिवे, रोहित पाथरकर, विनोद शिरसाठ, शैलेश जगधने, महिला जिल्हा संघटक ॲड. पुष्पा येळवंडे, रोहित जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे यांचे राजकीय व सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वसामान्य वर्ग शिवसेनेला जोडला गेला आहे. सर्व शिवसैनिक त्यांचा आदर्श समोर ठेवून राजकारण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाजी कदम म्हणाले की, शिवसेना सामाजिक बांधिलकी ठेऊन समाजात कार्य करत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांचा समाजकारणाचा वारसा शिवसैनिक पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेच्या शिकवणीप्रमाणे सर्वसामान्यांमध्ये जाऊन समाजकारण सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दत्ता कावरे यांनी दरवर्षी स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांची जयंती, पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करताना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक संभाजी कदम, संजय शेंडगे, दत्ता कावरे, युवकचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, अशोक दहिफळे, राम वडागळे, अविनाश भिंगारदिवे, रोहित पाथरकर, विनोद शिरसाठ, शैलेश जगधने, महिला जिल्हा संघटक ॲड. पुष्पा येळवंडे, रोहित जाधव आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)