शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (दि.4 सप्टेंबर) शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिक्षक-शिक्षिकांचा सपत्निक गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे प्रा. माणिक विधाते यांनी दिली.
बुधवारी 4.30 वाजता टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, प्राचार्य खासेराव शितोळे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक शिक्षक समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.