पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने दिल्लीत लाडू वाटून आनंद साजरा
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा समावेश झाल्याने दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे व जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी ना. आठवले यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर उपस्थित होते.
विजय वाकचौरे यांनी रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा मिळालेले स्थान हे आंबेडकरी जनतेची शक्ती असल्याची भावना व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, ना. आठवले पुन्हा सामाजिक न्याय राज्यमंत्री पदी विराजमान होत असून, हा आंबेडकरी जनतेचा अभिमान आहे. आंबेडकरी जनता महायुतीच्या मागे उभी राहिल्याने अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले. आठवले यांच्या माध्यमातून सत्तेत राहून समाजाचा सर्वांगीन विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.