हायब्रिड क्रेम्री कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल -मा.आ. अरुणकाका जगताप
नगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये अद्यावत हायब्रिड तंत्रज्ञानासह सोयी-सुविधांनी युक्त आणि लक्झरी सेडान असलेल्या कॅम्री या कारचे अनावरण मा.आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले. टोयोटाची कॅम्री ही जागतिक बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय असलेली लक्झरी सेडान असून, नवीन जनरेशन कॅम्रीमध्ये टोयोटाने अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान व लक्झरी सुविधांचा समावेश केला आहे. स्टायलिंगपासून ते परफॉर्मन्सपर्यंत, या गाडीने बाजारात एक वेगळाच मानक प्रस्थापित केला आहे.
कॅम्रीच्या कार अनावरण प्रसंगी चंद्रकांत गाडे, रविंद्र बक्षी, सुनील मुथ्था, अनिल ॲबट, हरजीतसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, वासन टोयोटा शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, ॲड. सुरेश ठोकळ, मनमीत सलूजा, राजेंद्र कंत्रोड, मुन्ना जग्गी, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राजेंद्र ससे, गणेश औटी, चिंटू गंभीर, कैलाश नवलानी, अर्जुन मदान, सुनील थोरात, डॉ. अनिल आठरे, आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अरुणकाका जगताप म्हणाले की, टोयोटा कंपनी ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असून, ग्राहकांची गरज व आवड ओळखून दर्जेदार वाहन बाजारपेठेत आनत आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला व आकर्षक लुकला महत्त्व देऊन क्रेमीच्या नऊव्या जनरेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हायब्रिड असलेली कार ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहे. वासन टोयोटा शोरुममध्ये ग्राहकांना मिळणारी उत्तम सेवेमुळे मोठा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला असून, उत्तम सेवा शोरुमच्या माध्यमातून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
टोयोटा कॅम्रीच्या नवीन मॉडेलमध्ये आकर्षक वाय-आकाराचे फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स आणि स्लीक कर्व्स देण्यात आले आहेत. या गाडीचा आधुनिक डिझाइन फक्त पाहणाऱ्यांनाच नव्हे तर चालवणाऱ्यालाही अभिमान वाटावा, असा आहे. 18-इंच अलॉय व्हील्स आणि क्रोम फिनिश असलेले डिटेल्स गाडीला अधिक आकर्षक बनवतात.
टोयोटा कॅम्री च्या इंटीरियरमध्ये प्रीमियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. नवी ड्युअल-टोन थीम, व्हेंटिलेटेड लेदर सीट्स आणि वुडन फिनिशिंग या सर्व गोष्टी गाडीच्या इंटीरियरला अधिक भव्य बनवतात. नवीन कॅम्रीमध्ये 2.5-लिटरचे पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 178 बीएचपी पॉवर आणि 221 एनएम टॉर्क जनरेट करते. या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे गाडीची इंधन कार्यक्षमता वाढली असून ती पर्यावरणपूरकही आहे. टोयोटा कॅम्रीच्या नवीन मॉडेलमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे कॅम्री उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते. सरासरी 22-24 किमी प्रतिलिटरची मायलेज असल्याने ही गाडी केवळ लक्झरीच नव्हे तर किफायतशीर पर्यायही ठरते. ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गाडीला अधिक स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करत असल्याची माहिती अनिश आहुजा व मनमीत सलूजा यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. नऊव्या जनरेशनची कॅम्री पाहण्यासाठी ग्राहक व कार प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.