• Thu. Jan 29th, 2026

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान

ByMirror

Aug 20, 2024

जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध व्हावा -विजयसिंह होलम

अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार बातमी उजेडात आणण्याचे काम करत असतात. आधुनिक काळातील डिजिटल तंत्रज्ञानाने छायाचित्रण क्षेत्रात मोठे बदल झालेले असतानाही छायाचित्रणाची असलेली दृष्टी व कला आजही कायम आहे. छायाचित्रकारांपुढे डॉक्युमेंटेशन करणे ही सर्वात मोठी जबाबदारी व आव्हान आहे. जुन्या काळात टिपलेल्या छायाचित्राचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध करण्याची जबाबदारी आजच्या छायाचित्रकारांची असल्याची भावना पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी केले.


मराठी पत्रकार परिषद व डिजीटल मीडिया परिषदच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख, दत्ता इंगळे, देवीप्रसाद अय्यंगार, डिजीटल मीडियाचे आफताब शेख, समिर मन्यार, वाजिद शेख, राजू खरपुडे, लहू दळवी, साजिद शेख आदी उपस्थित होते.


प्रारंभी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांनी सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. देवीप्रसाद अय्यंगार यांनी छायाचित्रण कलेचा 187 वर्षाचा प्रवास, काळानुरुप होत गेलेल्या बदलाचा इतिहास सर्वांपुढे ठेवला. तर आजच्या डिजीटल युगातील छायाचित्रणाचे तंत्र व भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू भागानगरे यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *