• Mon. Jan 26th, 2026

तारकपूर येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

ByMirror

Jan 22, 2026

जनतेला फक्त विकासाची अपेक्षा, ती महायुतीच्या माध्यमातून साध्य होणार -संदीप पवार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर परिसरात नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार नगरसेवकांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, जितू गंभीर, मोहित पंजाबी, काजल भोसले व सागर मुर्तुडकर यांचा भाजपचे शहर जिल्हा सचिव संदीप पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार, तुषार पवार, आशिष पवार, धीरज पवार, विशाल पवार, सुरज पवार, गौरव शेंडगे, रोहित डाके, अक्षय ससाणे, राहुल वडागळे, विशाल शेलार, सौरभ औचिते, आनंद घोरपडे, मंगलतार्इ पवार, कोमल पवार, रुपाली पवार, रोहित वैरागर, लकी काते, तन्मय सोनवणे, जॉयल पाटोळे, मनोज वाघमारे, अजय साळवे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संदीप पवार म्हणाले की, नवनिर्वाचित नगरसेवक हे केवळ पदासाठी निवडून आलेले नसून जनतेने विकासाच्या अपेक्षेने त्यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. हा विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्‍नांवर प्राधान्याने काम होणार आहे. जनतेला फक्त विकासाची अपेक्षा असून, ती महायुतीच्या माध्यमातून साध्य होणार असल्याचे स्पष्ट केले.


नवनिर्वाचित नगरसेवकांनीही नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका मांडली. सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींची तत्परता यामुळेच खरा विकास शक्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *