चेअरमनपदी मारुती कापसे व व्हाईस चेअरमनपदी मंगल फलके यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मारुती (गुलाब) धोंडीभाऊ कापसे यांची व व्हाईस चेअरमनपदी मंगल दत्तात्रय फलके यांची निवड झाल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नामदेव फलके, दत्तात्रय फलके, बळवंत खळदकर, बन्सी जाधव, सोसायटीचे संचालक जालिंदर आतकर, शिवाजी जाधव, महादेव पाचारणे, संभाजी पाचारणे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.