• Fri. Mar 14th, 2025

शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा

ByMirror

Aug 1, 2024

देशभरातून 877 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण ही काळाची गरज -दिनकरराव टेमकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला देशभरातून 877 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


नगर-कल्याण रोड, सुखकर्ता लॉन्स मध्ये ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
दिनकरराव टेमकर म्हणाले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या शिक्षणप्रवाहात अबॅकस मुलांच्या बुध्दीमत्तेला चालना देणारे आहे. अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामध्ये इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले सृष्टी मते, श्रावणी राख, प्रणित देसाई व सिध्दी नरवडे या चार विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सार्थक झगडे, स्वरा तांबे, सृष्टी मते, प्रेम चौकसकर, रेवा वासकर, प्रथमेश धोंडे, शौर्य काळे, धनुष राऊत, वेदांत गोरे, सिध्दार्थ दहिफळे, रनवीर ऊगले, अनुष्का पवार, श्रावणी राख, सान्वी नरवडे, जिग्याशु चौधरी, शांभवी कुलकर्णी, प्रणित देसाई, संग्राम बांबर्से, पारस खडसे, अदित्य मुळे, सिध्दी नरवडे या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देण्यात आले.


अकॅडमीत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या आकांक्षा टिमकारे, अश्‍विनी वराडे, छाया खळदकर, दैवशाला बळे, ज्योती बांदल, कांचन कडतन, संध्या सानप, स्वाती रकटाटे व मंगल मोरे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळभाऊ रकटाटे, माजी कृषी अधिकारी बलभीम शेळके, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय वन अधिकारी सचिन कंद, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसुळ, संतोष यादव, सीए लाभेश रणसिंग, महादेव भद्रे, डॉ. अमेय कांबळे, संदीप ठोंबरे, ॲड. महेश वारे, संतोष मगर, अशोक चौधरी, श्रीलता आडेप, बनपिंप्रीचे सरपंच गौतम पठारे, नामदेव पाटील वाळके, मुख्याध्यापिका ज्योती सुपारे, मुख्याध्यापक रामेश्‍वर पवार, उज्वला शेळके, अनभुले सर, घोडके सर आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अबॅकस व वैदिक गणितची माहिती दिली. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *