मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी अबॅकस शिक्षण काळाची गरज -आ. संग्राम जगताप
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 1017 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील नगर-कल्याण महामार्गावरील सुखकर्ता लॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. झटपट गणित सोडविण्याची परीक्षा यावेळी रंगली होती.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम अहिल्यानगर शहराचे लाडके व कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आ. संग्राम जगताप म्हणाले की, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी अबॅकस शिक्षण ही काळाजी गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते. देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर व नुकतेच आयएएस झालेले ओंकार खुंटाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले अनन्या घावटे, स्वराज रकटाटे, ओमराज पोकळे व प्रणित देसाई या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी राजवीर परदेशी, रुद्र सोले, शिवन्या कर्डिले, वेदांत हजारे, धवल खरात, सहर्ष कोल्हापुरे, प्रज्ज्वल मोरे, यज्ञेश पवार, कुणाल गायकवाड, वेदिका सायंबर, आर्या गायकवाड, चैतन्य आंबवणे, पृथ्वीराज सोले, आरुष होले, आर्य आरडे, सलोनी देशमुख, धनुष राऊत, वेदांत गोरे, शिवराज झांबरे, श्रावणी राख, समर्थ राऊत या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या स्नेहल सातपुते यांना टू स्टार अवार्ड, किरण परदेशी, अश्विनी थोरवे यांना स्टार टिचर अवार्ड तर अर्चना पांडुळे, मोनिका वाबळे, स्नेहल जाधव व योगीता खेळवणे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, कराड येथील उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, परांडा चे नायब तहसिलदार पांडुरंग माढेकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडळे, नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, नगर जि. प. माध्य. शिक्षण विभाग अधिक्षक महावीर धोदाड, आष्टी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सीमाताई काळे, पारनेर चे सहकार अधिकारी राजेंद्र वाघमोडे, महावीर कन्स्ट्रक्शन चे संचालक राजेश भंडारी, महाराष्ट्र राज्य पोस्टल संघटना अध्यक्ष संतोष यादव, अ. नगर दैनिक दिव्य मराठी चे उपसंपादक अनिल हिवाळे, विद्याताई यादव, मंडळ अधिकारी गजेंद्र राठोड, अ. नगर सहकार बँकेचे जनसंपर्क अधिकारी भारत सोले, युनियन बँकेचे मॅनेजर शरद वाळके व वैभव गावखरे, नामदेव रकटाटे कैलास गुंजाळ, म्हातारदेव म्हस्के, भाऊसाहेब कबाडी, श्रीलता आडेप, प्रियंकाताई लामखडे, अनिल लष्कर, हेमलता पाटील, रत्नमाला चौधरी, कुमार कापसे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, सार्थक शेळके व सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.