शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांचे सामाजिक योगदान अभिमानास्पद -भाऊसाहेब कचरे
महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या (जि. जळगाव) वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी सोसायटीचे माजी संचालक बाळासाहेब पिंपळे, सचिव स्वप्निल इथापे, प्रा. चंद्रकांत फसले, संदीप भवर, लहानबा जाधव आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब कचरे म्हणाले की, एकनिष्ठपणे ग्रामीण भागात डोंगरे यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. सोसायटीचे सभासद असलेले डोंगरे यांच्या कर्तृत्वाचा नेहमीच सन्मान करण्यात आलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व विविध क्षेत्रात त्यांचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. प्रत्येक वर्षी सोसायटीने पुरस्कार व विविध निवडीबद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रात असणारे योगदान अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीने नेहमीच पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचे काम केले. विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सोसायटीने सन्मान केला. सोसायटीचा सन्मान हा कुटुंबात झालेला सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
