राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांची मागणी; जिल्हा रुग्णालयाला निवेदन
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे नामंतर झालेले असताना शहरातील जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डावरे यांना सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी दीपक वाघ, किरण घुले, ऋषिकेश जगताप, मंगेश शिंदे, राजू मकासरे, रोहित सरना, कृष्णा शेळके, कुणाल ससाणे, गौरव हरबा, ओंकार मिसाळ, केतन ढवण आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या अधिसूचनेनुसार अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर असे झालेले आहे. या निर्णयाला मोठा कालावधी उलटूनही जिल्हा रुग्णालयाचे नाव अहमदनगर हेच ठेवण्यात आलेले आहे. तरी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तात्काळ हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शहरातील जिल्हा रुग्णालयाचे नाव अहिल्यानगर अशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.