भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम
हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात दिशादर्शक वाटचाल -संतोष बोथरा
नगर (प्रतिनिधी)- चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर 15 वे मास खमणनिमित्त 62 वर्षीय मुकेश मुथियान यांनी सलग 31 दिवसांचे पाण्यावर आधारित उपवास पूर्ण केले. या उपवासाची सांगता झाल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

तर भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये मुथियान यांच्या हस्ते व उद्योजक संतोष बोथरा, सचिन कस्तुरे, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, संदीप शिंगवी, सागर काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, दीपक धाडगे, दिलीप ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, रतन मेहेत्रे, मनोहर दरवडे, अविनाश पोतदार, अशोक पराते, सुधीर कपाळे, अभिजीत सपकाळ, अविनाश जाधव, सुभाष पेंढुरकर, अनिल सोळसे, दीपक मेहतानी, राजू कांबळे, दीपकराव घोडके, सरदारसिंग परदेशी, शेषराव पालवे, सुनिता बनकर, मंगल लांडे, वंदना चौधरी, सौ. देवराईकर, सविता शेळके, प्रांजली सपकाळ, सुनिता मुथियान, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, प्रज्योत सागु, रामनाथ गर्जे, शिरीष पोटे, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, अनिल हळगावकर, सुंदरराव पाटील, संतोष लुनिया, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, विशाल भामरे आदी उपस्थित होते.
मुकेश मुथियान म्हणाले की, 1990 सालापासून हरदिन मॉर्निंग ग्रुप कार्यरत झाला. संजय सपकाळ यांच्या माध्यमातून चार सदस्यांपासून पाचशेपेक्षा अधिक सदस्य या ग्रुपला जोडले गेले. अनेक वर्षापासून आरोग्य संपत्ती जपण्याचे कार्य ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. तर सामाजिक कार्यात योगदान देखील सुरु असून, लावलेल्या छोट्याशा रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले असल्याचे ते म्हणाले. तर उपवासाबद्दल सांगताना प.पू. आनंदऋषीजी यांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घेऊन 1978 साला पासून उपवास सुरू केले. आठ दिवसापासून सुरू केलेले उपवास 31 दिवसापर्यंत आले आहेत. फक्त पाणीवर हे उपवास केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन उपवासाने शरीराची व मनाची शुद्धी होत असल्याचे सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप हा फक्त व्यायामाचा किंवा आरोग्य राखण्याचा मंच नाही, तर तो एक कुटुंब आहे. दररोज सकाळी लवकर उठून जॉगिंग, व्यायाम, ध्यान आणि परस्पर संवादातून सर्व सदस्य सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण करत असतात. ग्रुपचे सदस्य असलेले मुथियान यांचे उपवास हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्या जीवनशैलीत शिस्त, संयम आणि साधनेच्या मार्गाने जो आत्मिक विकास केला आहे, त्यातून सर्वांना शिकण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष बोथरा म्हणाले की, आजच्या काळात आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म या तिन्ही बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात दिशादर्शक वाटचाल सुरु आहे. मुथियान सरांसारखे व्यक्तिमत्त्व हे समाजासाठी आदर्श ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.