• Wed. Jul 2nd, 2025

मुकुंदनगरचे रस्ते, पथदिवे व सोनोग्राफी मशीनसाठी खासदारांना निवेदन

ByMirror

Jul 24, 2024

निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते शम्स खान व माजी नगरसेवक फैय्याज शेख यांनी वेधले लक्ष

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर भागामधील रस्त्यांची प्रलंबीत कामे, पथदिवे व सोनोग्राफी मशीनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शम्स खान व माजी नगरसेवक फैय्याज शेख (केबलवाला) यांनी केली.


जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी खासदार लंके यांची भेट घेऊन खान व शेख यांनी मुकुंदनगरच्या प्रश्‍नावर लक्ष वेधले. मुकुंदनगर भागामध्ये फकीरवाडा ते अक्सा मस्जिद व एरिगेशन ऑफिस ते दर्गा दायरा दरम्यान मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.

सदर रस्त्यावर खड्डे पडले असून, पावसाचे पाणी रस्त्यामध्ये साचून रहदारीस मोठी अडचण निर्माण होत आहे. मुकुंदनगर भागातील इतर ठिकाणच्या रस्त्यांची देखील अत्यंत दुरवस्था झालेली असून, हे रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या भागातील बऱ्याच ठिकाणी पथ दिवे कार्यान्वित नसल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मुकुंदनगर भागामधील रस्त्यांची व पथदिव्यांचे काम प्राधान्याने करणे आवश्‍यक आहे. तसेच मुकुंदनगरच्या आरोग्य केंद्रात सोनोग्राफी मशीनची अत्यंत आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट करुन सदर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *