विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण; विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
राज्य पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मानार्थ विविध उपक्रम राबविण्यात आले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करुन महिला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा रंगल्या होत्या. तर राज्य पातळीवर चमकलेल्या विविध खेळातील खेळाडूंना गौरविण्यात आले.
महिला व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. प्रारंभी देवीची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जून मदान, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, राकेश गुप्ता, मनोज मदान, अनिश आहुजा, अमित खामकर, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, मेहतानी, अमन वाही, राजा नारंग, विवेक गुप्ता, रविंद्रसिंग नारंग, अमृत मुथा, माजी शहर अभियंता रोहिदास सातपुते, अमरीश सहानी, कमल कोल्ही, शशांक मालपाणी, सागर सारडा, गोकुळ जगधने, शिवम पवार, अभिलाषा मदान, अर्चना मदान, अर्पणा मदान, शारदा होशिंग, अमिता कंत्रोड, सुमित्रा वाही, गगन वाही, जसबीरकौर नारंग, अनिश धुप्पड, दिलप्रीत नारंग, रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या अध्यक्षा स्विटी पंजाबी, वैशाली टाक, स्मिता तळेकर, सुमन बांगर, शुभदा कुलकर्णी, सरस्वती सावंत, अनुराधा खोसे, शोभा लोखंडे, वर्षा लोखंडे, शारदा मचाले आदींसह माऊली भजनी मंडळाच्या सदस्या व परिसरातील महिला, युवती व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शितलताई जगताप म्हणाल्या की, गुलमोहर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती झाल्या असून, मात्र मोरया युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. नागरिकांना प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रम एक पर्वणी ठरत आहे. प्रतिष्ठानने महिला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
अर्जुन मदान म्हणाले की, गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य केले जात आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळ रुजविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत मनोज मदान यांनी केले.
प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात दांडिया, फॅन्सी ड्रेस, उखाणे, चित्रकला, पाककला, रांगोळी, संगीत खुर्ची, भजन आदी विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या महिला व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते चांदीच्या गणपतीची प्रतिमा व घड्याळचे बक्षिस देण्यात आले.
