छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात रंगणार काव्यांची मैफल
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके, कार्याध्यक्षपदी उद्योजक बाळासाहेब शहाणे तर विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांच्या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती काव्य संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख व संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी चौथे काव्य संमेलन रंगणार आहे. यामध्ये नवोदित कवी व नामवंत कवींचा सहभाग असणार आहे.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा काव्य संमेलनाचे संयोजक डोंगरे यांनी आमदार लंके, उद्योजक शहाणे व माजी जिल्हा परिषद सदस्य लामखडे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. काव्य संमेलनाच्या निवड समितीने एकमताने सदर निवडी केल्या आहेत.
