गावाच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सहकार्य राहणार -आ. जगताप
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल किरण सुभाष जाधव यांचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष लहू कराळे, केमिस्ट संघटनेचे संचालक मनोज खेडकर, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, भैय्या पवार, मोहन भुतकर, कुणाल भुतकर आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या विविध विकास कामासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट करुन, गावाच्या सर्वांगीन विकासासाठी जाधव यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना किरण जाधव यांनी गावातील प्रलंबीत प्रश्न सोडवून विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगून, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ दिले जात असल्याबद्दल आभार मानले.