भिंगारला स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त
छावणी परिषदेत अडकलेला भिंगार मोकळा श्वास घेणार व विकासाला चालना मिळणार -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णयासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांचा भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या निर्णयाने भिंगार शहराचा सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, कार्याध्यक्ष अभिजीत सपकाळ, संपत बेरड, सुदाम गांधले, प्रशांत डावरे, दीपक लिपाणे, राजू जंगम, मतीने ठाकरे, अक्षय नागापुरे, ॲड. साहेबराव चौधरी, दीपक राहींज, अभिजीत पवार, प्रदीप वावरे, अजिंक्य भिंगारदिवे, श्याम वागस्कर, दिनेश लंगोटे विशाल बेलपवार, ओंकार फिरोदे, मच्छिंद्र भिंगारदिवे आदींसह नागरिक उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तर स्वतंत्र क वर्ग नगरपालिका संदर्भात जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे लष्कराच्या छावणी परिषदेत अडकलेला भिंगार मोकळा श्वास घेणार असून, येथील विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्चाची ठरली. त्यांच्या पाठपुराव्याने स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.