पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदारांनी केले डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
डोंगरे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीला गती देण्याचे कार्य केले -आमदार संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जळगाव जिल्ह्यातील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व आमदार निलेश लंके यांनी सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष येवले, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, भाऊसाहेब चौधरी, रमेश कांबळे, अजय लामखडे, घनश्याम म्हस्के, विद्या भोर, अतुल फलके, संग्राम केदार, शिवा कराळे, रामदास अडागळे, भरत बोडखे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक कार्याने व्यक्तीची प्रतिमा निर्माण होते. डोंगरे यांनी सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्रासह त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीला गती देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, साहित्य, पर्यावरण, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे कार्य करत आहे. चळवळीतला प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य सुरु असल्याची भावना व्यक्त करुन त्यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी समाजकारण हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन कार्य सुरु असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.